Thursday, April 12, 2018

ऑक्सफर्ड जवळील थेम्स नदी

थेम्सच्या मागावर :
काही कामा निमित्ताने  इंग्लड मधील रेडीग शहरात महिना दोन महिने  राहण्याचा योग आला.  काम काही महिन्यासाठी असल्याने एकटाच गेलो होतो.
लंडन बाहेर हे छोटेसे गाव असल्याने फावल्या वेळात काय करायचा प्रश्न होता. सुरवातीचे काही दिवस लंडन ऑक्सफर्ड  शहरे  ट्रेनने बघण्यात गेला. दोन्ही प्रवासात सतत दिसायची ती शांतपणे वाहणारी थेम्स नदी..प्रवासात ह्या नदीचे कुतूहल फार वाटायचे. अतिशय खराब  वातावरण असलेल्या इंग्रज लोकांनी ह्याच नदी काठी लोकं संस्कृती उभी केली व त्या  लोकांनी अवाढव्य जहाजे बनविली आणि सर्व जगावर राज्य केले.
अशा ह्या नदीच्या उगम पासूनचा-समुद्र पर्यंतचा  प्रवास , इतिहास माझे कुतूहल वाढवत होता.  पाश्चिमात्य देशात नदीच्या बाजूने चालण्यासाठी रस्ता असल्याने रेडीग पासून काही दिवस थेम्स नदीच्या काठाने जायचे ठरवले व
अशक्य होता.. त्यामुळे जमेल तसा  मी चालत   साधारण  दिवसला २५  कि मी  अश्या प्रकारे  सुट्टीच्या दिवसात  साधारणता १०० कि मी चा हा  ट्रेल संपवला!



रेडिंग मधील थेम्स
त्या प्रमाणे थेम्सच्या मार्गाचा अभ्यास केला.  तर हा चालण्याचा मार्ग तब्बल ३०० किमी होता आणि रेडिंग बरोबर मध्य भागी!  एकीकडे उगम स्थान तर दुसरी कडे मानव निर्मित पहिले महा शहर .  दोन्ही दिशेल जाण्याचा माझा उत्साह शिगेला पोहचला. अर्थात मला सुट्टी फक्त शनिवार - रविवार असल्याने हा १५ दिवसाचा सलग ट्रेल
लंडन मध्येअवाढव्य झालीली थेम्स

No comments: