Saturday, April 21, 2018

 युनियन /फोर्थ आणि क्लाएड कालवा:
वाहते पाणी मग ते निसर्ग  निर्मित असो किंवा मानव निर्मित .. स्वच्छ पाणी बघण्यात  व त्या बाजूला होणारी परिसंस्था (Ecosystem)/मानवाची वसाहत बघण्याची मजा खूप असते. ब्रिटनच्या औद्योगिक प्रगतीस हि शकडो वर्षाचे  मानव निर्मित कालवे कारणीभूत  आहेत. जुन्या काळात तोच सोईस्कर  दळण वळणाचा मार्ग होतों. रेल्वेच्या जाळ्या नंतर तो थोडा काळ दुर्लक्षीत झाला. पण  आता परत बोट पर्यटना साठी वापरात आले आहेत. अशा ह्या कालव्याचे  कडेने चालताना ब्रिटनचा हिरवा गार 'गावा' कडील भाग डोळ्यांचे पारणे फेडतात. हे सर्व कालवे अनेक लॉक  वापरून   पाणी उंच - सखल भागात  खेळवले आहे तसेच हे लॉक बोटींना दोन वेग वेगळ्या पाणी पातळी वर उचलण्यास किंवा उतरण्यास मदत करतात. युनियन /फोर्थ आणि क्लाएड  हे दोन कालवे   बोटींसाठी  चक्क लिफ्टने जोडले आहेत. हे बोट उचलण्याचे इंजिनिअरेग अद्भुत आहे.

Union and Forth and Clyde Canal :
Watching ecosystem around any water source is fun be it man made or natual. Britain has thousands of km of man made canal.  These canals has important role in British industrial revolution.
Old days it was best route to transport goods. But as railway network became dominant, canals got neglected. But now because of recreational activities,they are used again. Watching green rural Britain while walking is spectacular. Locks took canals up and down hills. These locks can be used to raise or lower boats from one water level to another. But Union and Ford and Clyde canals are connected with actual boat lift. It is spectacular piece of engineering.


Tuesday, April 17, 2018

प्रवरा संगम -
काही फारशी माहित नसलेली ठिकाणे , काही वेळा कित्तेक शतके मागे घेवून जातात. पुणे-ओरंगाबाद प्रवास प्रथमच करताना मी अशाच एका ठिकाणी पाण्यात बुडालेले जुने मंदिर पाहून थांबलो. राम-शिवाचे खूप जुने मंदिर आणि सभोवताली पाणी पाहून पुढे प्रवास करायचा विचार रद्द केला आणि मंदिर आणि नदी परिसर हिंडायचे ठरवले. अर्थात तो नदी परीसर हा गोदावरी आणि प्रवरा संगमचा होता. प्रवरे काठी आयुष्य जावूनही,
आपण इथे आलो नाही त्यामुळे थोडा स्वत:चा राग आला पण आता तरी चुकून आलो याचे समाधान वाटले. ६००-७०० वर्षा पूर्वीचे हेमाडपंथी मंदिर डोळ्याचे पारणे फेडतात.
त्यातच गोदावरी वरील धरणा मुळे व मानवाचे अतिक्रमण नसल्याने काही ठिकाणी दलदलीचा - गवताळ प्रदेश झाला आहे. अशा 'मानव' विरहीत ठिकाणी स्थलांतरीत पक्षी पण खूप दिसतात.

The Confluence of Pravara & Godavari Rivers -
When you visit some ancient place which is not publicly not known, it throws you back into ancient times. Accidentally, I bumped in to such a place recently on the Pune–Aurangabad highway. While driving, I noticed some submerged old structured temples while crossing the bridge. After further investigation about the place came to know that those are very ancient temples of Shiva and Rama. Visiting Ancient temples was enough motivation for me to explore this place... Temples were built based on ancient Maharashtra architectural style - Hemadpanti. In this style of architecture mainly basalt rocks are used and these rocks are easily available in western maharashtra. This style got its name from its creator - Hemadpant.
Since area is cut off from rest of human world, nature flourished in this area causing large area to be swamped and well covered with grass. While going to other side of river, I noticed many birds apart from normal duck and goose.