Monday, April 30, 2018

शिकागो नदी :
शिकागो शहराचे अप्रतिम आर्किटेक्चर पाहताना जाणवते सुभोवतालचे पाणी -- मिशिगन लेक आणि हिरवी शिकागो नदी . जगभरातील मोठी शहरे साधारणत मोठी नदी जेथे समुद्राला मिळते तिथे विकसित झाली आहेत. अपवाद आहे शिकागो शहराचा. शिकागो नदी उत्तर अमेरिका खंडातील पाच मोठी सरोवर व मिसिसिपी नदी यांना जोडणारा दुवा आहे. ह्या दुव्या मुळे पाच मोठी सरोवर गल्फ ऑफ मेक्सिको शी जोडली गेली आहे आणि त्यामुळे ह्या शहराचा प्रचंड विकास झाला. अमेरिकीतील तिसऱ्या नंबर च किंवा जगातील ७ नंबरच शिकागोच यश ह्या छोट्याशा नदीत व त्यावरील मानव निर्मित कालव्यात सामवले आहे. शिकागो शहराने ह्या नदीला झेंड्या मध्ये पण मानाचे स्थान दिले आहे ! झेंड्या मधील दोन निळ्या रेषा उत्तर आणि दक्षिण नदीच्या शाखा दर्शवतात.

Chicago River :
Watching Chicago's man made building architecture, you can't deny two big natural sources - Michigan lake and Chicago river. All over world big cities are located on (sea) mouth of big river except Chicago.This city is located near Michigan Lake and Chicago river. Chicago river and along with man made canal is link between great lakes and Mississippi river. Because of this Chicago portage, five big lakes are joined to Gulf of Mexico, causing tremendous development of Chicago. It is 3rd largest city in USA (7th world wide) and relatively small Chicago river (250km) is instrumental. Flag of Chicago honors Chicago river. Two blue strips in flag represents south and north branches of river.








Tuesday, April 24, 2018

Chao Phraya River

Chao Phraya River:
Rivers in western Maharashtra originate in  Sahyadri ranges. So people like me who stays near footsteps of sahyadri
are not used to see huge rivers or delta regions of river. When I got chance to visit Chao Phraya near Bangkok I was immensely pleased.
By the time Chao Phraya reaches Bangkok, it has already  traveled around 1000 km (lengths include tributary river Naan). For hundreds of years thai
culture evolved around this river. Because of flat land water is everywhere so everywhere  there is rice farming, river house, boat food vendors.

चाओ फ्राया  नदी :
पश्चिम महाराष्ट्रातील नद्याचा उगम हा सह्याद्री खोऱ्यात मुख्यता होतो. त्यामळे माझ्या सारख्या सह्याद्रीच्या पायथ्याशी राहण्यार्यास मोठया नद्यांची, त्रिभुज प्रदेशाची  सवय नाही.  त्यामुळे  भल्या मोठ्या चाओ फ्राया नदीला  भेट दिली त्यावेळीस  खुश झालो.  बँकॉकलाही  नदी जेव्हा पोहचते तेव्हा जवळ जवळ १००० किमी प्रवास केलेला असतो
(तिला मिळणाऱ्या नान नदीची लांबी धरून )  ह्या १००० किमी च्या प्रवासात थाई संस्कृती शतकोशतके  विकसित झाली आहे. हा प्रदेश बहुताशी सकल असल्याने  पाणी सगळी कडे आहे  त्यामळे सर्वत्र पाण्यातील घर, बोटी वरील मार्केट, भात शेतीआहे.



Saturday, April 21, 2018

 युनियन /फोर्थ आणि क्लाएड कालवा:
वाहते पाणी मग ते निसर्ग  निर्मित असो किंवा मानव निर्मित .. स्वच्छ पाणी बघण्यात  व त्या बाजूला होणारी परिसंस्था (Ecosystem)/मानवाची वसाहत बघण्याची मजा खूप असते. ब्रिटनच्या औद्योगिक प्रगतीस हि शकडो वर्षाचे  मानव निर्मित कालवे कारणीभूत  आहेत. जुन्या काळात तोच सोईस्कर  दळण वळणाचा मार्ग होतों. रेल्वेच्या जाळ्या नंतर तो थोडा काळ दुर्लक्षीत झाला. पण  आता परत बोट पर्यटना साठी वापरात आले आहेत. अशा ह्या कालव्याचे  कडेने चालताना ब्रिटनचा हिरवा गार 'गावा' कडील भाग डोळ्यांचे पारणे फेडतात. हे सर्व कालवे अनेक लॉक  वापरून   पाणी उंच - सखल भागात  खेळवले आहे तसेच हे लॉक बोटींना दोन वेग वेगळ्या पाणी पातळी वर उचलण्यास किंवा उतरण्यास मदत करतात. युनियन /फोर्थ आणि क्लाएड  हे दोन कालवे   बोटींसाठी  चक्क लिफ्टने जोडले आहेत. हे बोट उचलण्याचे इंजिनिअरेग अद्भुत आहे.

Union and Forth and Clyde Canal :
Watching ecosystem around any water source is fun be it man made or natual. Britain has thousands of km of man made canal.  These canals has important role in British industrial revolution.
Old days it was best route to transport goods. But as railway network became dominant, canals got neglected. But now because of recreational activities,they are used again. Watching green rural Britain while walking is spectacular. Locks took canals up and down hills. These locks can be used to raise or lower boats from one water level to another. But Union and Ford and Clyde canals are connected with actual boat lift. It is spectacular piece of engineering.






Tuesday, April 17, 2018

प्रवरा संगम -
काही फारशी माहित नसलेली ठिकाणे , काही वेळा कित्तेक शतके मागे घेवून जातात. पुणे-ओरंगाबाद प्रवास प्रथमच करताना मी अशाच एका ठिकाणी पाण्यात बुडालेले जुने मंदिर पाहून थांबलो. राम-शिवाचे खूप जुने मंदिर आणि सभोवताली पाणी पाहून पुढे प्रवास करायचा विचार रद्द केला आणि मंदिर आणि नदी परिसर हिंडायचे ठरवले. अर्थात तो नदी परीसर हा गोदावरी आणि प्रवरा संगमचा होता. प्रवरे काठी आयुष्य जावूनही,
आपण इथे आलो नाही त्यामुळे थोडा स्वत:चा राग आला पण आता तरी चुकून आलो याचे समाधान वाटले. ६००-७०० वर्षा पूर्वीचे हेमाडपंथी मंदिर डोळ्याचे पारणे फेडतात.
त्यातच गोदावरी वरील धरणा मुळे व मानवाचे अतिक्रमण नसल्याने काही ठिकाणी दलदलीचा - गवताळ प्रदेश झाला आहे. अशा 'मानव' विरहीत ठिकाणी स्थलांतरीत पक्षी पण खूप दिसतात.

The Confluence of Pravara & Godavari Rivers -
When you visit some ancient place which is not publicly not known, it throws you back into ancient times. Accidentally, I bumped in to such a place recently on the Pune–Aurangabad highway. While driving, I noticed some submerged old structured temples while crossing the bridge. After further investigation about the place came to know that those are very ancient temples of Shiva and Rama. Visiting Ancient temples was enough motivation for me to explore this place... Temples were built based on ancient Maharashtra architectural style - Hemadpanti. In this style of architecture mainly basalt rocks are used and these rocks are easily available in western maharashtra. This style got its name from its creator - Hemadpant.
Since area is cut off from rest of human world, nature flourished in this area causing large area to be swamped and well covered with grass. While going to other side of river, I noticed many birds apart from normal duck and goose.








Sunday, April 15, 2018

फॉक्स ग्लेसीयर

फॉक्स ग्लेसीयर:
काही काही नावांचे आपल्याला फार अप्रुप असते. उदा नावा मध्ये सक्सेना, मित्तल. पिक्चर, पेपर मुळे असेले.. हे सर्व अति श्रीमंत व आपण्यास भेटण्याची काही शक्यता नसते!! तसेच माझे पाण्याच्या संदर्भात नद, हिमनदी.
त्यात संगमनेर सारख्या पर्जन्य छायेच्या प्रदेशातील मी  भरपूर पाणी  बघयला मिळणे हीच चैन असल्याने नद, हिमनदी मला अशक्य वाटे.  भारतात हिमनदी, उंच उंच उत्तरे कडील हिमालयात आणि  नद अति पूर्वेला .  सुदैवाने जागतिककरण्याच्या लाटे मध्ये नद, हिमनदी बघायला मिळाली.
खालील फोटो हे फॉक्स ग्लेसीयर - दक्षिण न्युझीलँड बेटा वरील आहते. साधारण १३ किमी लांबी असेलेली हि हिमनदी  सदन आल्प्स (दक्षिण न्युझीलँड मधील पर्वत रांग ) मध्ये उगम पावते.
सहज भेट देण्यासारखी असल्याने खूप  पर्यटक जातात.

Fox Glacier
Few names you just marvel considering their exotic nature. Glacier is one of them. Considering their origin and being from
tropical part of India, never thought I will get a chance to see glacier in my life time. But because of globalization, I did!

Following pictures are Fox Glacier - South New zealand island. This 13 km long glacier originate from southern alps (south NZ mountain ranges).
Since it is easily accessible by road, many tourist visit daily.






Saturday, April 14, 2018

Mula River

Once upon a time.. tranquil boat club of COEP Pune

Thursday, April 12, 2018

क्वाही नोई नदी
जगभरातील भौगोलिक आणि  मानव निर्मित  कृत्रिम सीमारेषाचे मला फार आवड आहे. ह्या रेषा का व कशा पडल्या ह्याचा माझा सतत शोध चालू असतो. असाच थायलंड आणि  ब्रम्ह देश मधील सीमा रेषा शोधताना कांचनबुरी  आणि  क्वाही नोई नदी ला पोहचलो.  दुसऱ्या महायुद्धात हा परिसर जपान च्या ताब्यात होतों व
जपान ने त्यावेळीस  नागरिक आणि युद्ध कैदी यांचा छळ करून रंगून ते बैंकॉक हा क्वाही नोई नदी  खोर्यातून जाणारा रेल्वे मार्ग बांधला. साधारण:ता  २ लाख लोकं ह्या कामा साठी वापरले व त्यातील १ लाख मेले. त्यामुळे जपानने बांधलेल्या हि रल्वे 'डेथ  रल्वे ' म्हणून प्रसिद्ध आहे..युद्ध कैद्यांनी बांधलेला रल्वे ब्रिज अजूनही
क्वाही नोई नदी वर आहे. ह्या घटना वर आधारित तीन  सुप्रसिद्ध पिक्चर्स आहेत. The Bridge on the River Kwai - 1957, Return from the River Kwai- 1989 and The Railway Man- 2013.
    
River Khwae Noi
I always admired geographical boundary  and man made boundaries around world. While searching for closest boundary between Thailand and Myanmar, I came   across town Kochanaburi and river Khwae Noi. During world war - II, town was under control of Japanese rule and japan built railway between Rangoon  and Bangkok through Khwae Noi river valley. Japan used 2 lakhs forced labour using civilian and allied POW of which half died. So burma railway is  called death railway. Japan built bridge is still standingon Mae Klong river. There are three famous movies based on  events around bridge     - The Bridge on the River Kwai - 1957, Return from the River Kwai- 1989 and The Railway Man- 2013. 







ऑक्सफर्ड जवळील थेम्स नदी

थेम्सच्या मागावर :
काही कामा निमित्ताने  इंग्लड मधील रेडीग शहरात महिना दोन महिने  राहण्याचा योग आला.  काम काही महिन्यासाठी असल्याने एकटाच गेलो होतो.
लंडन बाहेर हे छोटेसे गाव असल्याने फावल्या वेळात काय करायचा प्रश्न होता. सुरवातीचे काही दिवस लंडन ऑक्सफर्ड  शहरे  ट्रेनने बघण्यात गेला. दोन्ही प्रवासात सतत दिसायची ती शांतपणे वाहणारी थेम्स नदी..प्रवासात ह्या नदीचे कुतूहल फार वाटायचे. अतिशय खराब  वातावरण असलेल्या इंग्रज लोकांनी ह्याच नदी काठी लोकं संस्कृती उभी केली व त्या  लोकांनी अवाढव्य जहाजे बनविली आणि सर्व जगावर राज्य केले.
अशा ह्या नदीच्या उगम पासूनचा-समुद्र पर्यंतचा  प्रवास , इतिहास माझे कुतूहल वाढवत होता.  पाश्चिमात्य देशात नदीच्या बाजूने चालण्यासाठी रस्ता असल्याने रेडीग पासून काही दिवस थेम्स नदीच्या काठाने जायचे ठरवले व
अशक्य होता.. त्यामुळे जमेल तसा  मी चालत   साधारण  दिवसला २५  कि मी  अश्या प्रकारे  सुट्टीच्या दिवसात  साधारणता १०० कि मी चा हा  ट्रेल संपवला!



रेडिंग मधील थेम्स
त्या प्रमाणे थेम्सच्या मार्गाचा अभ्यास केला.  तर हा चालण्याचा मार्ग तब्बल ३०० किमी होता आणि रेडिंग बरोबर मध्य भागी!  एकीकडे उगम स्थान तर दुसरी कडे मानव निर्मित पहिले महा शहर .  दोन्ही दिशेल जाण्याचा माझा उत्साह शिगेला पोहचला. अर्थात मला सुट्टी फक्त शनिवार - रविवार असल्याने हा १५ दिवसाचा सलग ट्रेल
लंडन मध्येअवाढव्य झालीली थेम्स