Wednesday, March 10, 2010

खेळ मांडला


























तमाशाप्रधान चित्रपट मला फारसे आवडत नाहीत, मुख्य कारण त्यातील गावाकडील खलनायक मला कधी आवडले नाहीत.बहुतेक निळू फुलेच्या सशक्त अभिनयामुळे असेल कदाचित. नटरंग बघण्यास त्यामुळेच मी तयार नव्हतो. पण चित्रपटातील गाणी ऐकून, खास करून 'खेळ मांडला' ऐकून पाहण्याची इच्छा झाली. पिक्चर चांगलाच आहे. अतुल कुलकर्णीचे 'पहेलवान ते नाच्या'    बदल अप्रतिम.. पण मला वेड लागले ते 'खेळ मांडला' गाण्याने. माणसाच्या जीवनात बरेच बरेवाईट प्रसंग येतात. पण मनाला भिडणारी दुःख कोणी कलेतून व्यक्त केले की डोळे पाणवतात.  ते गाणं आपल्या जीवनावर आधारलेले आहे असे वाटेत रहाते. मला तर  आयुष्य फुटबॉल सारखे वाटायला लागते.  सीमा नसलेल्या मैदानात आपण  वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड देत भरकटत राहोतो.  पिक्चर पाहिल्यानंतर मला बऱ्याच मित्रांनी ते गाण आपल्यास लागू होते हेच सांगितले. लोकांना दुःखद  गाण किती समान पातळीवर आणते. 
तसे पाहिल्यास आपल्या अंदाजे 21900 दिवसांच्या (60 वर्ष!) आयुष्यात दुःखद  प्रसंग कमी असतात पण त्यानंतरच्या संबंधीत घटना, घडामोडी आणि  विचार आपल्या मानगुटीवर बरेच दिवस चिकटून राहतात. यावरून मला जुनी म्हण आठवली
"माणूस दुःख चगळत चगळ खातो तर सुख घटाघटा पितो."  
दुःख चगळत चगळत, आपण  या सारख्या गाण्यातील जगण्यासाठी लढण्याच्या ओळी सोयीस्करपणे विसरतो.

No comments: