Monday, April 30, 2018

शिकागो नदी :
शिकागो शहराचे अप्रतिम आर्किटेक्चर पाहताना जाणवते सुभोवतालचे पाणी -- मिशिगन लेक आणि हिरवी शिकागो नदी . जगभरातील मोठी शहरे साधारणत मोठी नदी जेथे समुद्राला मिळते तिथे विकसित झाली आहेत. अपवाद आहे शिकागो शहराचा. शिकागो नदी उत्तर अमेरिका खंडातील पाच मोठी सरोवर व मिसिसिपी नदी यांना जोडणारा दुवा आहे. ह्या दुव्या मुळे पाच मोठी सरोवर गल्फ ऑफ मेक्सिको शी जोडली गेली आहे आणि त्यामुळे ह्या शहराचा प्रचंड विकास झाला. अमेरिकीतील तिसऱ्या नंबर च किंवा जगातील ७ नंबरच शिकागोच यश ह्या छोट्याशा नदीत व त्यावरील मानव निर्मित कालव्यात सामवले आहे. शिकागो शहराने ह्या नदीला झेंड्या मध्ये पण मानाचे स्थान दिले आहे ! झेंड्या मधील दोन निळ्या रेषा उत्तर आणि दक्षिण नदीच्या शाखा दर्शवतात.

Chicago River :
Watching Chicago's man made building architecture, you can't deny two big natural sources - Michigan lake and Chicago river. All over world big cities are located on (sea) mouth of big river except Chicago.This city is located near Michigan Lake and Chicago river. Chicago river and along with man made canal is link between great lakes and Mississippi river. Because of this Chicago portage, five big lakes are joined to Gulf of Mexico, causing tremendous development of Chicago. It is 3rd largest city in USA (7th world wide) and relatively small Chicago river (250km) is instrumental. Flag of Chicago honors Chicago river. Two blue strips in flag represents south and north branches of river.








Tuesday, April 24, 2018

Chao Phraya River

Chao Phraya River:
Rivers in western Maharashtra originate in  Sahyadri ranges. So people like me who stays near footsteps of sahyadri
are not used to see huge rivers or delta regions of river. When I got chance to visit Chao Phraya near Bangkok I was immensely pleased.
By the time Chao Phraya reaches Bangkok, it has already  traveled around 1000 km (lengths include tributary river Naan). For hundreds of years thai
culture evolved around this river. Because of flat land water is everywhere so everywhere  there is rice farming, river house, boat food vendors.

चाओ फ्राया  नदी :
पश्चिम महाराष्ट्रातील नद्याचा उगम हा सह्याद्री खोऱ्यात मुख्यता होतो. त्यामळे माझ्या सारख्या सह्याद्रीच्या पायथ्याशी राहण्यार्यास मोठया नद्यांची, त्रिभुज प्रदेशाची  सवय नाही.  त्यामुळे  भल्या मोठ्या चाओ फ्राया नदीला  भेट दिली त्यावेळीस  खुश झालो.  बँकॉकलाही  नदी जेव्हा पोहचते तेव्हा जवळ जवळ १००० किमी प्रवास केलेला असतो
(तिला मिळणाऱ्या नान नदीची लांबी धरून )  ह्या १००० किमी च्या प्रवासात थाई संस्कृती शतकोशतके  विकसित झाली आहे. हा प्रदेश बहुताशी सकल असल्याने  पाणी सगळी कडे आहे  त्यामळे सर्वत्र पाण्यातील घर, बोटी वरील मार्केट, भात शेतीआहे.